WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
You are currently viewing Ladaki hafta April राज्यातील 8लाख लाडक्या बहिणींना फक्त 500रुपये मिळणार मुख्यमंत्र्यांचा निर्णय Ladaki hafta April संपूर्ण माहिती

Ladaki hafta April राज्यातील 8लाख लाडक्या बहिणींना फक्त 500रुपये मिळणार मुख्यमंत्र्यांचा निर्णय Ladaki hafta April संपूर्ण माहिती

राज्यातील  लाडकी बहिणीसाठी चिंता वाढवणारे मोठी बातमी समोर येत आहे राज्यातील लाडक्या  बहिणींना आता दीड हजार रुपये नाहीतर फक्त पाचशे रुपये मिळणार आहे तर कोणत्या लाडक्या बहिणींना ही फक्त पाचशे रुपये मिळणार आहे त्याबाबत आता सरकारने पात्रता निकष जाहीर केलेले आहेत महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2024 मध्ये एक जुलै लाडकी बहिणी योजना सुरू केली होती या अंतर्गत राज्यातील जवळपास दोन पूर्णांक 74 करोड महिलांना याचा लाभ मिळत होता त्यानंतर छाननी प्रक्रिया सुरू केली आणि त्यानंतर काही लाडक्या बहिणींना पत्र करण्यात आलं तर काही लाडक्या बहिणींना फक्त आता पाचशे रुपये मिळणार आहे तर नेमके पाचशे रुपये कोणत्या महिलांना मिळणारे भगव्यात संपूर्ण माहिती.

Ladaki hafta April राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेतील अटीनुसार दोन योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनाचा हप्ता आता कमी मिळणार आहे. या महिलांना नमो शेतकरी योजनेच्या रक्कमेनंतर शिल्लक राहणारी रक्कम मिळणार आहे. राज्यात आठ लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे छननीनंतर स्पष्ट झाले.

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही. नमो शेतकरी योजनेत महिलांना सहा हजार रुपये वर्षाला मिळतात. तसेच केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये मिळतात. म्हणजेच या महिलांना शासकीय योजनेचे वर्षाला बारा हजार रुपये मिळत आहे.

यामुळे या महिलांना आता वर्षाला राहिलेले सहा हजार रुपयेच लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 500 रुपये मिळणार आहे.राज्य सरकारने 2023 मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. म्हणजेच चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर म्हणजे 30 एप्रिल रोजी मिळणार आहे. त्यावेळी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 9 हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले. मात्र एप्रिलचा 10 हप्ता मिळालेला नाही. तो 30 एप्रिल रोजी मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana


Share the Post

Leave a Reply