MahaDBT Farmer Login : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना एकाच वेबसाईटवर विविध योजनांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन महाडीबीटी फार्मर पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे. या नवीन महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी लॉगिन करून ऑनलाईन फॉर्म किंवा अर्ज भरू शकणार आहेत. याबद्दलचीच थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
योजना नाव | MahaDBT Farmer Login Portal |
विभाग | कृषी विभाग |
लाभार्थी कोण | शेतकरी वर्ग |
लाभ स्वरुप | विविध योजनांसाठी अर्ज |
अर्ज प्रक्रिया | आँनलाईन |
जुना पोर्टल | येथे क्लिक करा |
नवीन पोर्टल | येथे क्लिक करा |
Mahadbt Farmer Login
शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून तब्बल 25 ते 30 पेक्षा जास्त योजना राबविल्या जातात. याला कृषी विभागाकडून “अर्ज एक योजना अनेक” या नावानं पण संबोधलं जातं. शेतकऱ्यांना शेती उपयोगी विविध घटक खरेदी केल्यानंतर त्या घटकासाठी शासनाकडून अनुदान दिलं जातं. ही अनुदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाडीबीटी फार्मर लॉगिन पोर्टल (Mahadbt farmer portal) सुरू करण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली जुनी MahaDBT Login काही तांत्रिक कारणास्तव योग्यप्रकारे चालत नसल्याकारणाने, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना होत असलेल्या अडचणीचा आढावा घेऊन. Mahadbt Farmer Login नवीन पोर्टल सुरू करण्यात आला; कारण मागील पोर्टलमध्ये अर्ज करणे, कागदपत्र अपलोड करणे, अर्जाची स्थिती तपासणे यासाठी विविध अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत होते.
MahaDBT Farmer जुना पोर्टल
शेतकऱ्यांना होत असलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन https://mahadbtmahait.gov.in/Farmer/RegistrationLogin हे पोर्टल संपूर्णतः बंद करून त्याऐवजी नवीन पोर्टल तयार करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना या पोर्टलवरच सर्व घटकासाठी अर्ज करावा लागेल. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login ही नवीन वेबसाईट कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली असून आता या वेबसाईटमध्ये कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण येत नाही, त्यामुळे शेतकरी या नवीन महाडीबीटी फार्मर पोर्टलवर सुरळीतपणे अर्ज करू शकत आहेत.
नवीन महाडीबीटी पोर्टल लॉगिन प्रक्रिया
कृषी विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या नवीन महाडीबीटी पोर्टलची लॉगिन प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, कागदपत्र अपलोड करण्याची पद्धत या सर्व गोष्टी जुन्या वेबसाईटप्रमाणे किंवा पोर्टलप्रमाणे सारख्याच असणार आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही, फक्त नवीन पोर्टलचा युआरएल (URL) म्हणजेच वेब ऍड्रेस बदलण्यात आला आहे. यामुळे नवीन पोर्टलवरील कार्यपद्धती जुन्या पोर्टल प्रमाणेच असणार आहे, त्यामुळे तुम्ही त्याच पद्धतीने MahaDBT Farmer Login पद्धत वापरू शकता.
MahaDBT Farmer Login & Registration Process
Mahadbt farmer portal is specially designer for Maharashtra farmers to give them various government schemes. This portal full fill all requirements of farmer regarding subsidy equipments etc. The speciality of this portal is farmer doesn’t need to feel separate form for each scheme. Farmers can easily apply or access various schemes under 1 roof throw a single form.
Mahadbt former portal provides best accessibility and benefits for farmer cause there is no need to visit any government places to take benefits, just need to register and login on mahadbt portal that’s it.
MahaDBT Farmer Scheme List
शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतात लागणाऱ्या बी-बियाणापासून ते ट्रॅक्टर खरेदीपर्यंत विविध योजनांसाठी अनुदान दिलं जातं. शेतकऱ्यांच्या जमीन धारण पात्रतेनुसार शेतकऱ्यांना विविध योजना सदर पोर्टलवर तयार करण्यात आलेल्या आहेत, त्यासाठी पात्र शेतकरी MahaDBT Portal Registration करून विविध योजनांचा लाभ मिळवू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ! महाडीबीटी फार्मर पोर्टलवर राबविण्यात येणाऱ्या विविध कोणकोणत्या योजना आहेत ? तर तुम्ही खालीलप्रमाणे mahadbt farmer scheme list म्हणजेच विविध योजनांची यादी पाहू शकता.
- कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजना
- फलोत्पादन योजना
- सिंचन साधने व सुविधा
वरील घटकांमध्ये विविध प्रकारच्या योजना समाविष्ट आहेत ज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, स्पिंकलर अनुदान योजना, ठिबक सिंचन अनुदान योजना इत्यादी विविध योजनांचा समावेश आहे.
महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून कोणत्या योजना राबविण्यात येतात ?
महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेती उपयोगी येणाऱ्या जवळपास 25 पेक्षा जास्त योजना राबविल्या जातात, यामध्ये यंत्र अवजारे, सिंचन व साधने, फळबाग इत्यादी महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश आहे.